आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी ८ मेपूर्वी कोर्टात हजर राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणात काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी ८ मेपूर्वी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. राहुल यांना सोमवारी न्यायालयात हजर राहायचे होते. आधी त्यांच्या वकिलाने वैयक्तिक उपस्थितीपासून सूट मिळावी, अशी मागणी केली, पण तशी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राहुल आता ८ मे अथवा त्यापूर्वी न्यायालयात हजर राहतील, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयात लिहून दिले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीपासून राहुल गांधी सुटीवर गेले आहेत. तेव्हापासून ते कुठे आहेत याची माहिती नाही. राहुल लवकरच परततील, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आता राहुल ८ मेपूर्वी परत येतील, असा दावा त्यांच्या वकिलांनी भिवंडी न्यायालयात केला.