आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VVIP भक्तांना आलिंगण देते राधे मां, राहुल महाजन करणार \'पोल खोल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची राधे मांसोबत ओळख असल्याचे सांगितले जाते. त्यांचा चिरंजीव राहुल महाजन राधे मांचे आणखी गुपीत उघडणार असल्याचे सांगितले जात आहे. VVIP भक्तांसाठी राधे मांकडून खास आयोजन केले जाते. यावेळी ती भक्तांना बराच वेळा आलिंगण देते. याबाबत लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे राहुल महाजन यांनी सांगितले आहे.
राहुल महाजन यांनी सांगितले आहे, की पुढील आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या एका मासिकात एक मोठा खुलासा केला जाणार आहे. त्यात राधे मांची पोल खोल केली जाणार आहे. त्यानंतर लोकांना राधे मांची खरी ओळख पटेल. राधे मां ही आसाराम बापू सारखी आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सुखविंदर कौरला राधे मां म्हणणे चुकीचे आहे. यामुळे हिंदू धर्माची प्रतिमा मलिन होत आहे.
राहुलने पोस्ट केले होते राधे मांचे फोटो
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेले राधे मांचे फोटो राहुल महाजनने ट्विट केले होते. राहुल यांच्याकडे हे फोटो कोठून आलेत असा प्रश्न आता विचारला जात आहे. हे फोटो भारतात काढण्यात आलेले नाहीत. राहुल आणि राधे मां काही वर्षांपूर्वी विदेशात होते. तेव्हा राहूलने हे फोटो काढले होते, असे सांगितले जात आहे. हे फोटो केवळ राहुलकडेच आहेत. हे फोटो खरे आहेत की खोटे याबाबत अद्याप कुणी काही स्पष्टीकरणे दिलेले नाही.
लोक देताहेत राहुलला माहिती
गेल्या महिन्यात एका महिलेने राधे मां विरुद्ध कौटुंबीक छळाची तक्रार दिली होती. ही बातमी मीडियात आल्यावर साधे मांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राहुल महाजनने फोटो ट्विट केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मला लोकच राधे मांची माहिती देत असल्याचा दावा राहुलने केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, राहुल महाजनने ट्विट केलेले राधे मांचे फोटो....