आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Narvekar News In Marathi, Shiv Sena, Vidhan Sabha Election

विधान परिषद निवडणुकीतून माघारीचा निर्णय पक्षाचाच : राहुल नार्वेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी मला पक्षातील नेत्यांनीच सांगितले होते. उद्धव ठाकरे मुंबईत नसल्याने मी त्यांची नावे सांगू शकत नाही. त्यांच्याकडेच सांगेन,’ असा खुलासा शिवसेनेचे विधान परिषदेतील उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्यावर पक्ष दोन दिवसात कारवाई करणार आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने नीलम गोर्‍हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. भाजपनेही दोन उमेदवार उभे केले होते. मात्र संख्याबळ पाहता चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच होती. विनोद तावडे यांचे निवडून येणे कठीण दिसत असल्याने त्यांनी व राष्ट्रवादीच्या एका नेत्यानेही नार्वेकर यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. उद्धव ठाकरेंना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच नार्वेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र मी शिवसैनिक असून इतर पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.