आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'IIT\' तून बाहेर पडताच कंपनीची सुरुवात, करोडोंचा टर्नओव्हर होताच हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- Housing.com चे माजी सीईओ आणि को-फाउंडर राहुल यादव - Divya Marathi
फाईल फोटो- Housing.com चे माजी सीईओ आणि को-फाउंडर राहुल यादव
मुंबई- Housing.com चे माजी सीईओ आणि को-फाउंडर राहुल यादव यांची कंपनीतून बुधवारी हकालपट्टी करण्यात आली. कंपनीचे सगळ्यात मोठे गुंतवणूकदार सॉफ्ट बँकेच्या वकिलांनी बुधवारी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये यादव यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला. आपल्याला माहित असेलच की, मुंबई आयआयटीतून शिक्षण घेतलेल्या राहुल यादवने housing.com ला केवळ दोन वर्षातच 130 मिलियन डॉलरची गुंतवणूक करून एका उंचीवर नेले होते.
घर शोधताना त्रास झाल्यानंतर सुरु झाली कंपनी-
आयआयटीत शिक्षण घेतल्यानंतर राहुल यादव व त्यांचे मित्र आदित्य शर्मा यांनी पाहिले की, आपल्या मित्रांना मुंबईत घर शोधण्यात खूपच अडचण येत आहे. या समस्येतून तेही गेले होते. त्यासाठी घर शोधण्यासाठी एक ऑनलाईन स्टॉर्टअपची कल्पना मनात सुचली. ज्याला हाऊसिंग डॉट कॉम असे नाव दिले. लवकरच हे लोकप्रिय झाले. याचे यश पाहून अनेक बड्या देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी यात रस दाखविला. 2012 मध्ये आयआयटीतून बाहेर पडताच त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती.
टॉपर राहिले आहेत राहुल यादव-
राहुल यादव राजस्थानमधील अलवरचे रहिवासी आहेत. राहुल जेव्हा 10 वीच्या वर्गात होते तेव्हा ते अभ्यासात खूपच कच्चे होते. मात्र 12 वी सायन्सला त्यांनी 75 टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एवढेच नव्हे तर राजस्थानात ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मैथ्स स्ट्रीममध्ये टॉपर राहिले. यानंतर त्यांनी आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी दिली जाणारी स्कॉलरशिप मिळवली. त्यानंतर त्यांची निवड आयआयटी, मुंबईसाठी झाली.
दोन वेळा दिला होता राजीनामा-
कंपनीतून हकालपट्टी होण्याआधी राहुल यादव यांनी दोन महिन्यांत दोनदा राजीनामा दिला होता. पहिल्यांदा कंपनीच्या बोर्ड मेंबर्सने राजीनामा स्वीकारला नाही मात्र, दुस-यांदा दिलेला राजीनामा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने स्वीकारला आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, राहुल यादव यांचे निवडक PHOTOS...