आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड: अनितामाई धर्माधिकारी यांचे पुण्यात निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ निरुपणकार दत्तात्रय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी श्रीमती अनिता माई धर्माधिकारी यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. त्या 63 वर्षाच्या होत्या. अनितामाईंना ह्दयविकाराचा झटका आला होता त्यातच त्यांचे निधन झाले. दरम्यान, अनितामाईंच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
अनितामाईंच्या निधनाचे वृत्त कळताच अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुययांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रायगडमधील रेवदंडा येथील निवासस्थानी एकच गर्दी केली. याबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी अनितामाईंचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनितामाईंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, धर्माधिकारी परिवाराकडून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या कार्यात माईंचा सक्रिय सहभाग होता. अध्यात्मिक निरुपणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे कार्य या परिवाराकडून केले जात आहे. त्यात माईंची भूमिका मोठी होती. त्यांच्या निधनाने श्री सदस्यांचा एक मायेचा आधारस्तंभ हरपला आहे.