आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकलचा डबा घसरल्याने भायखळा ते CSMT दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्जतला जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी-मशीद स्थानकादरम्यान रुळावरुन घसरला आहे. लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकलचा डबा घसरल्याने भायखळा ते सीएसएमटी दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.  सीएसटीएम स्थानकापासून 50 मीटर अंतरावर मोटरमनजवळचा 7 वा डबा घसरला. दुपारी पावणेतीच्या सुमारास ही घटना घडली.
 
दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास लोकलचा हा अपघात झाला. सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरुन ही लोकल कर्जतच्या दिशेने निघाली होती. लोकलचा वेग कमी असतानाच हा लोकलचा एक डबा रुळावरून घसरला.  दरम्यान रेल्वे सेवा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रेल्वेच्या प्रत्येक गोष्टीची तातडीने सुधारणा व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ
बातम्या आणखी आहेत...