आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railminister & Cm Reaction On Central Railway Local Train Disruption

मध्य रेल्वे: प्रवाशांच्या उद्रेकाची रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मध्य रेल्वेची सेवा नव्या वर्षाच्या दुस-याच दिवशी सकाळच्या सत्रात सहा तासांहून अधिक वेळ ठप्प होती. अखेर दुपारी 1 वाजता कडक पोलिस बंदोबस्तात सीएसटीकडे गाडी सोडण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. दरम्यान, प्रवाशांच्या उद्रेकाची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. प्रभू व फडणवीस यांनी आजच्या घटनेबाबत माहिती मागवली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या दोघांनी यासंदर्भात टि्वट केले आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबत टि्वट करून म्हटले आहे की, प्रवाशांसोबत आज झालेला प्रकार दुर्देवी आहे. याबाबत सरव्यवस्थापक यांना चौकशीचे व सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. दिवा ते सीएसटी ट्रॅकचा अभ्यास करून या मार्गावरील त्रुटी करण्यात येतील.
रेल्वे मंत्रालय महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करीत आहे. तसेच महाराष्ट्रात नविन एसपीव्ही (Special Purpose Vehicle) आणण्याबाबत आम्ही काम करीत आहोत. राज्य आणि केंद्राच्या मदतीने लवकरच याबाबत काहीतरी पर्याय काढला जाईल, असेही प्रभूंनी टि्वट केले.
वाढत्या लोकसंख्येने मुंबई लोकल सेवेवर अतिताण पडत आहे. याबाबत खूपच दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत तत्काळ नविन आराखडा तयार करून मार्ग काढणे गरजेचे आहे. खूप मोठे काम आहे पण काळाची गरज म्हणून यावर काम केले पाहिजे, असेही प्रभू यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, झालेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहे. सामान्यांना अशा प्रकारचा त्रास करावा लागू नये यासाठी आम्ही यात नक्कीच लक्ष घालू असे म्हटले आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना घटनास्थळी पाठविले असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली जाईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी या विषयाबाबत नुकतीच चर्चा केली आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही यावर आम्ही काम करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.