आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Police Arrested 61 Year Old Thief In Mumbai

सात भाषांचा जाणकार चोरटा, विदेशी पर्यटकांना लुटायचा, पासपोर्ट करायचा परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चक्‍क सात भाषांवर प्रभुत्‍व मिळवून विदेशी पर्यटकांकडील मौल्‍यवान वस्‍तूंची चोरी करणा-या चोरट्याला रेल्‍वे पोलिसांनी पकडले आहे. किशोर सुब्रम्हण्यम मदाली असे या 61 वर्षीय चोरट्याचे नाव आहे. तो विदेशी पर्यटक किंवा अनिवासी भारतीयांशी मैत्री करत असे. एकदा त्‍यांचा विश्‍वास संपादन केला की, त्‍यांच्‍याकडून मौल्‍यवान वस्‍तूंची चोरी करून तो पसार होत असे. मात्र, रेल्‍वे पोलिसांनी नुकतेच त्‍याला ताब्‍यात घेतले आहे.
चोरी करून कागदपत्रे करायचा परत
किशोर मदाली हा विदेशी नागरिकांच्या मौल्‍यवान वस्‍तू चोरत असे, पण त्या व्यक्तींची महत्वाची कागदपत्रे त्यांना परत करत होता. त्यामुळे हा अर्धप्रामाणिक चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. देवीदासन शिवराम सोनारी या सौदी अरेबियन नागरिकाचा पासपोर्ट मदालीने प्रामाणिकपणे परत केला होता. १६ ऑगस्टला किशोर मदालीने मंगलोर एक्सप्रेसमधून सोनारी यांच्या मौल्यवान वस्तूंची, बॅग्जची चोरी केली होती. मात्र, त्याने मंगलोर येथील सोनारी यांच्या पत्त्यावर पासपोर्ट परत पाठवला होता. विशेष म्‍हणजे मदारीने भारतातील सौदी दुतावासाकडून सोनारी यांचा पत्ता मिळवला होता.
पोलिसांनी किशोर मदालीकडून पाच विदेशी पर्यटकांच्या मौल्यवान वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. मदाली याच्यासह आणखी काही व्यक्ती या चोरीप्रकरणात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रुको मिगा मुफिजा इसा (२४) हा नायजेरियातील रहिवाशी तामिळनाडूतील अण्णामलाई विद्यापीठात शिकत होता. मदालीने या विद्यार्थ्याची बॅग चोरली. मात्र, त्याने या विद्यार्थ्याचा पासपोर्ट त्याच्या पत्त्यावर परत पाठवून दिला. अण्णामलाई विद्यापीठातून मदालीने त्याचा पासपोर्ट जप्त केला होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पदवीधर मदालीस कोणत्‍या सात भाषा येत होत्‍या, कसा सापडला जाळ्यात..