आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Problem At Mumbai Passengers Are Harassment

मुंबईकर पुन्हा वेठीस; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचा खेळखंडोबा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तीन दिवसांच्या सुटीनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर निघालेल्या मुंबईकरांना मध्यरेल्वेसह पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईनवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत‍ आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्टेशनजवळ कारशेडमध्ये जाणार्‍या रेल्वे गाडीला अपघात झाला आहे. दुसरीकडे दिवा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर ट्रक बंद पडला आहे. तसेच पश्चिम ट्रान्स हार्बर मार्गावर ऐरोळीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने वाहतुकीला अडचणी येत आहेत.

पश्चिम रेल्वे वाहतूक धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे. वाहतूक लवकरच सुरळीत होईल, असा दावा रेल्वे अधिकार्‍यांनी केला आहे. पश्चिम रेल्वेने ये-जा करणार्‍या चाकरमान्यांना सोमवारी सकाळी पश्चिम रेल्वेने चांगलेच रडकुंडीला आणले आहे. काही गाड्या धीम्यागतीने तर काही गाड्या रद्द झाल्याने पश्चिम रेल्वेचे प्लॅटफॉर्म प्रवाशांनी गच्च भरले आहेत. रेल्वेच्या गलथान कारभारामुळे चाकरमान्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.