आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात रेल्वेला गती, मराठवाडा, विदर्भातील प्रलंबित प्रकल्पांना लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत रविवारी मध्य रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात रविवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात अाली. या करारामुळे राज्यातील अनेक वर्षे रखडलेले रेल्वे प्रकल्प गतीने मार्गी लागणार असून या कराराचा सर्वाधिक लाभ मराठवाडा आणि विदर्भातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना होणार आहे.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्यातील मागास भागास रेल्वे मार्गाने जोडण्यात आल्यास त्या भागाचा विकास होण्यास मदत होते. यासाठीच वर्षानुवर्षे राज्यातील रखडलेले सर्व प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या करारामुळे राज्यातील बंदरे, रेल्वे आणि मुख्य रस्त्यांशी जोडली जातील. संपूर्ण परिवहन व्यवस्थेचे एकत्रीकरण होईल.’केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, मुंबईत देशभरातून लाखो प्रवाशी रेल्वेने येतात. त्याचबरोबर ७५ लाख प्रवासी दररोज लोकलचा प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेचा विकास खऱ्या अर्थाने देशाचा विकास आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांची तसेच राज्यातील प्रलंबित प्रकल्पांची माहिती दिली. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेसंबंधीच्या अनेक सूचना मांडल्या.

कुंभमेळ्यासाठी दर वीस मिनिटांनी ट्रेन
सिंहस्थ कुंभमेळयात महापर्वणीचे स्नान झाल्यानंतर भाविकांना तातडीने परत जायचे असते. ही बाब लक्षात घेऊन एकाच वेळी दोन ते तीन लाख भविकांच्या परतीच्या प्रवासाचा आराखडा रेल्वे विभागाने तयार केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांच्या सोई-सुविधेसाठी दर वीस मिनिटांनी नाशिकहून रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत माहिती देणारे होर्डिंग्स, वेळोवेळी उद्घोषणा ही करण्यात येणार आहे. तसेच याकाळात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कराराचे लाभ
- मुंबईतील विरार- डहाणू १२६ कि.मी, पनवेल-कर्जत ५६ कि.मी., ऐरोली ते कळवा ८ कि.मी. आदी प्रकल्प त्वरित मार्गी लागतील
- मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील (११), मध्य रेल्वे ( ८) आणि हार्बर रेल्वे (२) या तीनही मार्गावरील २१ स्थानकांचा पुनर्विकास. यासाठी १ हजार ९५० कोटी
- रुपये खर्च येणार आहे.
- जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर जेएसडब्ल्यू जिंदाल आणि कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये सह्या.
- जयगड बंदर ते संगमेश्वर हा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव. जयगड ते डिगणी हा ३३.७ कि.मी. चा हा नवीन रेल्वे मार्ग असेल.
- मुंबई शहर परिवहन प्रकल्प-३ अंतर्गत मार्गी लागणाऱ्या प्रकल्पांची किंमत ११ हजार ४४० कोटी रुपये अाहे.
- नगर- परळी, वर्धा- नांदेड मार्गालाही गती.
बातम्या आणखी आहेत...