आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर! लोकलच्या सेकंड क्लासची दरवाढ रद्द; फर्स्ट क्लासची दरवाढ मात्र कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रेल्वे भाडेवाढीविरोधात देशभरात जनक्षोभ उसळल्यानंतर केंद्र सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार केला आहे. मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्‍या लोकलमधील प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. 80 किलोमिटरपर्यंतच्या लोकल तिकिटाची दरवाढ रद्द कण्यात आली आहे. तसेच द्वितीय श्रेणीच्या (सेकंड क्लास) पासची 100 टक्के दरवाढही मागे घेण्यात आली आहे. मात्र, फर्स्टक्लासची 14.2 टक्के दरवाढ ही कायम ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.

मुंबई ते ठाणे या उपनगरीय मार्गावरील प्रवाशांना एकदम एवढा भार टाकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने तिकीटदर वाढवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सरकारसमोर ठेवला होता. रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव सरकारने मान्य केला आहे. तसेच रेल्वेची प्रस्तावित दरवाढ ही आता 25 जूनच्या ऐवजी 28 जूनपासून लागू होणार आहे.

दरम्यान, रेल्वेच्या लोकल सेवेच्या मासिक पासामध्ये करण्यात आलेली 100 टक्के दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे सरकारच्या विरोधात जनक्षोभ उसळला होता. सेकंड क्लासने प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना रेल्वे मंत्रालयाने दिलासा ‍दिला असला तरी फर्स्ट क्लासने प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना 14.2 टक्के दरवाढ सोसावी लागणार आहे.
दरम्यान, मुंबई-ठाण्यातील महायुतीचे खासदार, अामदारांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही दरवाढ मागे घेतली आहे. विरोधी पक्षासह सर्वमासामान्य मुंबईकरांनी या दरवाढीला मोठा विरोध केला होता.