आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलफिन्स्टनमधील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 122 स्थानकांचे रेल्वेकडून ऑडिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एलफिन्स्टनमधील चेंगराचेंगरीत 23 जणांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर अखेर आता रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. मुंबईतील 122 रेल्वे स्थानकांचे ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे.
 
या ऑडिटसाठी 13 विशेष पथके नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथके स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतील. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी 29 आणि 30 सप्टेंबरला मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून 10 दिवस उपनगरीय स्थानकांचे सुरक्षा ऑडिट होणार आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...