कुठे बरसला धो-धो, कुठे रिपरीप, जाणून घ्या पावसाची स्थिती आणि अंदाज
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मुंबई - पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी दिलासा देणारा पाऊस आहे.
येथे झाला पाऊस - ठाणे, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे जोरदार पाऊस झाला आहे. नाशिक आणि सांगलीतही पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात येत्या ७२ तासांत पाऊस होण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे.