आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीच्या भरपाईसाठी अहवाल आल्यानंतरच मदत : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील 13 जिल्ह्यांत गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला असून एकूण 1.36 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत दिली. राज्य आपत्ती निवारण निधीतून या भागांना तातडीची मदत दिली जाईल. अधिकच्या भरपाईसाठी येत्या दोन दिवसांत संपूर्ण अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्याच्या 13 जिल्ह्यात गारपीटीचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीसंदर्भात चर्चेदरम्यान विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरले. प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांची मदत करा आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी कर्जाचे हप्ते बंद करा या दोन प्रमुख मागण्या विरोधकांनी केल्या. सरकारने नेहमीच भरीव मदत केली असून याहीवेळी तशी मदत केली जाईल, असे पतंगराव कदम यांनी सांगितले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने विरोधी आमदार शरद पाटील आणि संजय गावंडे हे मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले.

तातडीने पावले उचला
नुकसान भरपाईबाबत शासनाने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी बुधवारी दिले. शिवाय शासनाने शुक्रवारी निवेदन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.