आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पावसाचा जोर कायम; रेल्वेसह विमानसेवा विस्कळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सकाळीही सरीवर सरी सुरुच असल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने चाकरमान्यांना कार्यालयात जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेसह उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणा झाला आहे. त्याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. मध्यरेल्वेच्या गाड्या 40 ते 45 मिनिटे उशिराने तर लोकल एक तास उशीराने धावत आहेत. तसेच पावसाचा फटका विमान वाहतुकीलाही बसला असून सर्व उड्डाने तब्बल अर्ध्या तास उशिराने सुरु आहेत.

लालबाग, भायखळा येथील वाहतूक सेवा विस्कळीत
लालबागसह भायखळा येथील लोकलचा खोळंबा झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यान लोकलसेवा ठप्प झाली आहे. रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.

तसेच पश्चिम, मध्यम व हार्बर रेल्वे सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. घाटकोपर, वडाळा व परळमध्ये पाणी साचले असून नागरिकांची एकच धावपळ सुरु आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूकही पावसामुळे मंदावली आहे.

मुंबईतील पावसाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...