आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून मुंबईत पोहोचला, संततधार पावसाची झड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदा विदर्भमार्गे महाराष्ट्रात अालेल्या मान्सूनने मुंबई गाठली. रविवारी रात्री व साेमवारी दिवसभर संततधार पाऊस बरसला, त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर चांगलेच सुखावले. राजधानीतील दमट हवेची जागा गारठ्याने घेतली असून कडक उन्हाऐवजी आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आहे. दरम्यान, काळबादेवी येथे छत कोसळून एकाचा झालेला मृत्यू सोडता मान्सूनचा पहिल्या दिवशी जनजीवनावर काेणताही परिणाम झाला नाही.

रविवारी दुपारपासून मुंबईत पावसाला सरुवात झाली. रविवारी २४ तासात शहरात ४१.६ मिमी तर पश्चिम उपनगरात ३३.४ मिमी पाऊस झाला. मान्सूनच्या पहिल्याच पावसात सायन, माटुंगा, दादर आणि शिवाजी पार्क परिसरात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्याचा ब्रिटानिया पपिंग स्टेशनमुळे तासाभरात निचरा करण्यात पालिकेस यश आले. काळबादेवी येथे घराचा सज्जा कोसळून एकाचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात शहरात ३१ झाडे कोसळली असून ११ ठिकाणी शाॅर्टसर्किटच्या घटनांची नोंद झाली आहे. धारावी क्राॅस रोड येथे हजराबाई चाळीतील घराचे छत कोसळून पाच लोक जखमी झाले. तसेच गोराई आणि जुहू चौपाटीवर बुडत असलेल्या तिघांना जीवरक्षकांनी वाचवल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत शहरात १५.४ मिमी, पूर्व उपनगरांत १.५८ मिमी तर पश्चिम उपनगरात ०. ८९ मिमी पावसाची नोंद झाली.
बातम्या आणखी आहेत...