आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून अपडेट : कोल्हापुरात, भामरागडला मुसळधार, 100 गावांचा संपर्क तुटला, पंचगंगेला पूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती. - Divya Marathi
गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती.
मुंबई/कोल्हापूर/औरंगाबाद/नागपूर- कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील ४८ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाने 100 गावांचा संपर्क तुटला आहे. येत्या 72 तासांत मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रवासात काही अडथळे आले असले तरी नियोजित वेळेत मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 
 
मुंबई, कोकणात पाऊस राहणार कायम
मुंबईसह कोकणात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासात तो आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  विदर्भातही येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिकमध्ये पाऊस सुरु झाला आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर
पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातील कोयना आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही मुसळधार पाऊस होत आहे. राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. लोणावळ्याच्या मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर पुन्हा काही दगड कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेस 15 मिनिटे उशीरा धावत होती.
 
LIVE UPDATES :
 
- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि चार्मोशी भागात मुसळधार पावसाने एका शाळेच छत कोसळले आहे. 
- चिपळूणजवळ परशुराम घाटात झाड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.  आता या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झाली आहे.
-  मंडणगड तालुक्यात मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे दिवसभरात 160 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील ४८ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...