आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज-अमिताभ भेटीने मनसे, सपात वादंग; इतिहासातील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. यासाठी मुंबईत सपातर्फे अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध लावलेली पोस्टर्स निमित्त ठरू शकतात. तसेच या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी सपा आणि मनसे यांच्यात झालेल्या राजकीय संघर्षाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुंबईत मनसेच्या कार्यक्रमात बच्चन यांची हजेरी समाजवादी पक्षाला चांगलीच खटकली आहे. राज ठाकरेंबरोबर मनसेच्या कार्यक्रमात हजर राहणे हा उत्तर भारतीय समाजाशी केलेला द्रोह असल्याचा दावा करत, सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी तशा आशयाची पोस्टर्स मुंबईत लावली आहेत. ज्या राज ठाकरेंनी मुंबईत उत्तर भारतीयांचे जगणे मुश्कील केले, ज्यांनी बच्चन यांच्या बंगल्यावर दगडफेक करायला लावली होती त्यांच्याशी पुन्हा मैत्री केल्याबद्दल या पोस्टर्समध्ये अमिताभ यांचा निषेध करण्यात आला आहे. या निमित्ताने अबू आझमी मनसेला पुन्हा एकदा आव्हान देऊ पाहत असल्याची चर्चा मनसेमध्येच सुरू झाली आहे. आता यावर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
आव्हान आणि उत्तर
पाच वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मुंबईतील एका कोळी महोत्सवात भाषण करताना मराठी अस्मितेचा मुद्दा पहिल्यांदा मांडला होता. परप्रांतीय जर तुमचा व्यवसाय हिसकावून घेत असतील, तर तुमचे कोयते बाहेर आलेच पाहिजेत, असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते. त्यावर आम्ही स्वसंरक्षणासाठी उत्तर भारतीयांना काठ्या वाटू असे प्रत्युत्तर अबू आझमींनी दिले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अमरसिंह यांची मुंबईतील पत्रकार परिषद उधळली होती. आणि त्यानंतर शिवाजी पार्कवर समाजवादी पार्टीच्या सभेदरम्यान सपा कार्यकर्त्यांना चोपही दिला होता.

पुढील स्लाइडमध्ये, आझमींवर राजच बोलतील