आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री शिल्पाचे पती उद्योगपती राज कुंद्राला गँगस्टर रवी पुजारीची धमकी, 3 कोटींची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गँगस्टर रवी पूजारीची दहशत मुबंईत वाढताना दिसत आहे. पुजारीने आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि आयपीएल टीम राजस्थान रॉयल्यचे मालक राज कुंद्रा यांना धमकी दिली आहे. पुजारीने कुंद्रा यांच्याकडून 3 कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज कुंद्राने पुजारीच्या धमकीनंतर पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या जुहू येथील घराची सुरक्षा त्यानंतर वाढविण्यात आली आहे.
गँगस्टर रवी पूजारी याआधी जुलैमध्ये चर्चेत आला होता. तेव्हा त्याने उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्या कार्यालयात फोन करुन अभिनेत्री प्रिती झिंटासोबत व्यवस्थित वागण्याचा इशारा दिला होता. पुजारी म्हणाला होता, की तो प्रितीचा फॅन आहे. वाडियांसोबत तिचा वाद झाल्यानंतर बॉलिवूडमधील कोणीही तिच्या पाठीशी उभे राहिले नाही, यामुळे नाराज असल्याचेही त्याने सांगितले होते.
टार्गेटचे खरे कारण दाऊद ?
रवी पुजारीच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, राज आणि शिल्पाला खंडणीसाठी फोन आलेला नसून त्याचे कारण वेगळेच आहे. पुजारीचे खरे वैर हे कराचीमध्ये राहात असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आहे. दाऊदच्या जवळच्या ग्लॅमर आणि उद्योग जगतातील लोक कायम पुजारीच्या निशाण्यावर असतात. राज आणि शिल्पाने आयपीएलची टीम राजस्थान खरेदी केल्यापासून ते पुजारीच्या निशाण्यावर आहेत.