आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Left Pune Visit Incomplete To Attending Marriage With Master Blaster Sachin

मास्‍टर ब्लास्टरसोबत लग्नसमारंभाला उपस्थित राहण्‍यासाठी राज यांनी सोडला पुणे दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एका लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी आपला पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या नगरसेवकांची झाडाझडती दोन -चार दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे राज्यातील आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या कार्याचा आढावा घेण्याची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी नाशिकच्या नगरसेवकांची हजेरी घेतल्यानंतर बुधवारी त्यांचे पुण्यात आगमन झाले होते. मात्र, बुधवारी रात्री तातडीने राज यांनी पुण्यातील दौरा अर्धवट टाकून मुंबई गाठली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका निकटवर्तीयाच्या विवाह सोहळ्यासाठी राज व सचिन तेंडुलकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र राजकीय कामाच्या व्यस्ततेत राज हा कार्यक्रम विसरले होते. मात्र पुण्यात गेल्यानंतर त्यांना या कार्यक्रमाची आठवण झाली व सचिनसोबतचा कार्यक्रम ‘मिस’ न करण्याच्या ओढीपायी त्यांनी तातडीने मुंबई गाठल्याचे राज यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शुक्रवारी राज मुंबईतील मनसेच्या नगरसेवकांची बैठक घेणार आहेत, त्यानंतर पुण्यातील नगरसेवकांना मुंबईतच बोलाविले जाईल.