आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj, Modi Will Present On The Balasaheb Thakare\'s First Death Anniversary

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज, मोदीही उपस्थित राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क येथे पाच लाख शिवसैनिकांच्या उपस्थितीत होत आहे. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह इतर पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
17 नोव्हेंबर रोजी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर श्रद्धांजली देण्यासाठी येणार आहेत. यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने जय्यत तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे, रिपाइंचे रामदास आठवले, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व इतर नेते या वेळी उपस्थित राहतील. या श्रद्धांजली कार्यक्रमाला नारायण राणे, मनोहर जोशी हे उपस्थित राहतील काय, याबाबत उत्सुकता कायम आहे. जोशी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमखांच्या नावाने स्मृती उद्यान तयार करण्याचे काम पूर्ण होत आले आहे.