आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीए परीक्षेत मुंबईचा राज शेठ पहिला, 800 पैकी मिळाले 630 गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट‌्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मंगळवारी सीए फायनल आणि सीपीटी परीक्षेचे निकाल जारी केले. गुणवत्ता यादीनुसार सीए फायनल परीक्षेत डोंबिवलीचा राज परेश शेठ देशात प्रथम आला. त्याला ८०० पैकी ६३० गुण मिळाले. गुणवत्ता यादीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या टॉप ५० जणांची नावे आहेत. राजनंतर वेल्लोरच्या अगथीस्वरनने ७५.२५ % गुणांसह दुसरा तर मुंबईच्याच कृष्ण पवन गुप्ताने ७५.१३ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. सीए फायनल १३२००७, सीपीटी ९३२६२ विद्यार्थ्यांनी दिली होती.