आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Going To Meet Salman Khan\'s At His Home

आमिर, राज, नितेश राणे सल्लूला भेटले!, सलमानला राजाश्रय नको- भाजप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राज ठाकरे, आमिर खान व सलमान खान यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा फाईल फोटो) - Divya Marathi
(राज ठाकरे, आमिर खान व सलमान खान यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा फाईल फोटो)
मुंबई- मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे अभिनेता सलमान खान याच्या भेटीसाठी त्याच्या वांद्रेतील गॅलेक्सी या घरी गेले. दुपारी एकच्या सुमारास राज ठाकरे सलमानच्या घराकडे निघाले. सलमानचे पिता सलिम खान यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. सुमारे दोन तास राज ठाकरे हे सलमान खानच्या घरात होते. याचवेळी अभिनेता आमिर खानही सलमानच्या घरी उपस्थित होता. त्यावेळी सलमानसह कुटुंबियांना राज यांनी धीर दिल्याचे समजते.
दरम्यान, राज ठाकरेंच्या पाठोपाठ नारायण राणेंचे पुत्र व काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन भेट घेतली. दुसरीकडे, सलमान खान प्रकरणाबाबत भाजपने दूर राहणे पसंत केले आहे. गुन्हेगार, शिक्षा झालेल्यांना व सलमानसारख्या आरोपींना राजाश्रय मिळू नये. तसेच राजाश्रय असल्यासारखे वातावरणही तयार करू नये असे मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे व नितेश राणेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला माहित असेलच की, सलमान खानला मंगवारी मुंबईतील सेशन्स कोर्टाने 5 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सलमान खान सध्या दोन दिवसाच्या तात्पुरत्या जामीनावर बाहेर आहे. उद्या पुन्हा त्याला हायकोर्टात सादर व्हावे लागणार आहे. उद्या हायकोर्ट त्यांच्या जामीनावर अंतिम निर्णय घेईल. यात सलमान खानला जामीन मिळू ही शकतो अथवा नाकारलाही जावू शकतो. जर सलमानला शुक्रवारी जामीन नाकारला तर त्याला तुरुंगात जावे लागेल. त्यामुळेच राज ठाकरेंनी आज दुपारीच वांद्र्यातील सलमान खानच्या घरी हजेरी लावली.
राज ठाकरे यांचे सलमान खानसोबत पहिल्यापासून मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याचबरोबर राज यांचे सलमानचे पिता सलीम खान व कुटुंबियांसह अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. सलमान व त्याच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खात सहभागी होऊन मी आपल्यासमवेत आहे हे राज दाखवून देत आहेत. सलमान खान हा सुद्धा राज ठाकरेंकडे गणपती व दिवाळीत घरी जातो. राज व सलमान यांच्या कौटुंबिक संबंध असल्याने कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संदेश दिला आहे.
राज ठाकरेंनी मागील महिन्यात संभाव्य मुंबई विकास आराखड्याबाबत एक परिसंवाद आयोजित केला होता. त्या परिसंवादात सलमान खानसह त्याचे पिता सलीम खान हे सुद्धा एक सुजाण मुंबईकर नागरिक म्हणून सहभागी झाले होते. मागील वर्षी मनसेने आयोजित केलेल्या कोळी महोत्सवालाही सलमान खानने हजेरी लावली होती.
दरम्यान, सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी सेलिब्रेटींची रीघ लागली आहे. गुन्हेगारांना राजकीय व्यक्तींनी भेटणे हे चुकीचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे मात्र कोणतेही फिकीर न बाळगता व्यक्तिगत व कौटुंबिक संबंध असल्याने जाणार हे उघड होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सलमानच्या घरी जाताना राज ठाकरे, नितेश राणे व आमिर खान यांचे फोटो...