आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचे वावडे आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
दिल्लीकडील उत्तर भारतीय सर्व पक्षीय नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी नको होते, त्यामुळे त्यांना 'पूर्ती' च्या खोट्या घोटाळ्यात गुंतवले. भाजप अध्यक्षपदाच्या आदल्या दिवशी त्यामुळेच पूर्तीशी संबंधित धाडी पडल्या असेही राज यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी हे प्रामाणिक नेते असून, त्यांचे पक्षातील वाढते महत्त्व सहन होत नसल्यानेच त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने मंगळवारी धाडी टाकल्या आहेत, असाही आरोप राज यांनी केला आहे.
नितीशकुमारांनी केले राजनाथ सिंगांचे अभिनंदन- राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे राजनाथ सिंग यांची निवड होताच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच राजनाथ सिंग हे मोठे असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून, त्यांच्या निवडीने भाजपला फायदा होईल, असे म्हटले आहे.