आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमधील मनसेचे चार नगरसेवक निलंबित, महापौर निवडणूकीत NCPला केली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अहमदनगर महापालिकेतील महापौरपदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या चार नगरसेवकांना निलंबित केले अाहे. याशिवाय त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मनसेच्या मतांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिषेक कळमकर यांची महापौरपदावर नियुक्ती झाली होती.


मनसेचे नगरसेवक गणेश भोसले, किशोर डागवाले, वीणा बोज्जा आणि सुवर्णा जाधव यांना पक्षादेश न पाळणे, पक्षशिस्तीचे पालन न करणे तसेच पक्षविरोधी कारवाया करणे या कारणास्तव पक्षामधून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या चौघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या पारड्यात मते टाकली होती.