आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झालं गेलं गंगेला मिळालं, दोन अँग्री यंग मॅनमधील सहा वर्षांची कटुता अखेर संपुष्टात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडमध्ये गेल्या शंभर वर्षांत अमिताभ बच्चन यांच्यासारखा मोठा कलाकार झाला नाही आणि पुढेही होणार नाही. अशी माणसे देवाने पाठवलेली असतात, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती केली. झाले गेले गंगेला मिळाले, असे सांगत त्यांनी अमिताभ यांच्याशी सहा वर्षांपासून असलेली कटुताही संपवून टाकली.
महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी चित्रपट सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सोमवारी हे मनोमिलन झाले. सेनेचा 7 वा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा उत्साहात पार पडला. राजकारण आणि बॉलीवूडमधील दोन अँग्री यंग मॅन एका व्यासपीठावर येण्याचा योग आज घडला. कार्यक्रमात शंकर महादेवन व सुरेश वाडकर यांच्या हिंदी-मराठी गाण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. कार्यक्रमाला सचिन पिळगावकर, संजय नार्वेकर, आसावरी जोशी, रझा मुराद, आमदार बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, स्वप्निल बांदोडकर, सोनाली बेंद्रे, स्वानंद किरकिरे, संजय मांजरेकर, केदार शिंदे, अतुल परचुरे, सुनील बर्वे अशी दिग्गज मंडळी हजर होती.

हिंदीची रेलचेल
चित्रपट सेनेच्या या कार्यक्रमात बॉलीवूडच्या शतकी कारकीर्दीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये हिंदी गाण्यांची मोठी रेलचेल होती.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, अमिताभविषयी काय म्हणाले राज ठाकरे