आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray And Nitin Gadkari Meet News In Marathi

राज ठाकरे आणि नितीन गडकरीची बंद द्वार भेट; \'कॉंग्रेसमुक्त भारत\'बाबत गुप्त चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्षात (भाजप) जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची मुंबईत आज (सोमवारी) झालेल्या गुप्त बैठकीने भर पडली आहे. मुंबईतील पंचतारांकिंत हॉटेलात झालेल्या बंद द्वार बैठकीत राज आणि ‍गडकरी यांच्यात 'कॉंग्रेसमुक्त भारत' या मुद्यावर चर्चा झाली. मात्र, या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहे.

राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष अॅड.आशीष शेलार यांनी 'ट्‍विटर'च्या माध्यमातून दिली. शेलार हे स्वत: या बैठकीला उपस्थित होते. परंतु यांच्या भेटीची आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे राज आणि गडकरी यांच्या भेटीचे वृत्त चुकीचे असल्याचे आपण यापूर्वी सांगितले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, राज- गडकरींची एकमेंकांवर स्तुतीसुमने मात्र शिवसेनेचा जळफळाट