आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्य सरकारचे चर्चेचे आवाहन धुडकावून लावत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधात बुधवारी राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. वाशी टोलनाक्यावर राज स्वत: आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. हे आंदोलन शांततेत केले जाईल. शाळा-कॉलेजेसवर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र मुख्य महामार्ग बंद पाडले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय या प्रश्नावर येत्या 21 रोजी गिरगाव चौपाटी ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली.
राज यांच्या स्थानबद्धतेची शक्यता
राज वाशी टोलनाक्यावर आंदोलनात उतरण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून मंगळवारी सायंकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त आहे. बुधवारी सकाळी राज यांना घरीच स्थानबद्ध केले जाण्याची शक्यता आहे.
सरकारशी चर्चेला नकार
ज्यांच्या चोरीवर माझा आक्षेप आहे अशा दरोडेखोरांशी काय चर्चा करायची, असा टोला राज यांनी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. सरकारला जागावाटपात रस आहे. त्यांनी चर्चेसाठी बोलावले, पण आधीच्या चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याने मी चर्चेला नकार दिला, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या टीकेवर ते म्हणाले, ज्यांच्यावर साधा डास मारल्याचा गुन्हा नाही त्यांनी भलते आरोप करू नयेत.
अटी अशा : 1. टोलबाबत निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम द्या, 2. पत्रकारांच्या उपस्थितीत चर्चा करा
चर्चेला या, अटी नकोत
राज यांनी भेटीची वेळ मागितली होती. बुधवारी दुपारी 12ची वेळ मी दिली. त्यांना ती गैरसोयीची आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजेची वेळ दिली आहे. मात्र 30 दिवसांत निर्णय व्हावा ही त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. कोणत्याही अटीशिवाय चर्चेला या, असे आम्ही त्यांना कळवले आहे. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री (राज यांच्या पत्रपरिषदेनंतर)
असे होणार आंदोलन
>सकाळी 9 वाजेपासून महामार्ग बंद होतील.
>शाळा, कॉलेजेसवर परिणाम होणार नाही
>बारावीच्या परीक्षेतही अडचण येणार नाही
>शांततेत व लोकांना त्रास होणार नाही
> होणार्या त्रासाबद्दल जनतेची माफी.
>औरंगाबादेत पैठण रोडवर आंदोलन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.