आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Backs BJP Leader Gopinath Munde In Beed

गोपीनाथ मुंडेंना पाठिंबा देऊन उपकार केले नाहीत - राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘चार दिवसांपूर्वी मनसेला महायुतीत स्थान नसल्याचे सांगणार्‍या गोपीनाथ मुंडेंनी आज मला फोन करून बीडमध्ये पाठिंब्याची मागणी केली. मीही लगेच पाठिंबा दिला. मात्र अचानक असे काय घडले की मुंडेंना माझ्या पाठिंब्याची गरज वाटली?’ असा प्रश्न मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर सभेत उपस्थित केला. तसेच ‘मुंडेंना पाठिंबा देऊन मी कोणतेही उपकार केले नाहीत, तर माझे मनच मोठे आहे’, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मुंबईतील जोगेश्वरी येथे महेश मांजरेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आणि मराठी माणसाचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी मला माझे खासदार दिल्लीत पाठवायचे आहेत’, असे सांगत ठाकरेंनी मराठी अस्मितेचा आपला जुनाच राग पुन्हा आळवला.

मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिल्लीत आपला हक्काचा माणूस असावा म्हणून मी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आपले खासदार दिल्लीत प्रयत्न करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मंत्रिपदे घेणार नाही
भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी दिलेल्या ‘मनसेने भाजपत विलीन व्हावे’ या सल्ल्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. ‘आपला पाठिंबा मोदींना आहे, तो राजनाथ सिंहांना नाही हे आधी तुम्हाला कळू द्या. मोदींना पाठिंबा म्हणजे एनडीएला नव्हे, किंवा जर आमचे खासदार निवडून आले तर ते काही एनडीएची मंत्रिपदे घेणार नाहीत,’ असेही राज यांनी स्पष्ट केले.

मुंडेंच्या पायाखालची वाळू घसरू लागली : सुरेश धस
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बीड जिल्ह्यातील आक्रमक प्रचारामुळेच भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकली असून ते आता जिकडे तिकडे मदतीसाठी सैरावैरा धावत सुटले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे, पण अशा पाठिंब्यांनी त्यांना आता कोणताही फायदा होणार नाही. कारण त्यांच्या खोट्या आश्वासनांना आता जनताच कंटाळली आहे. आणि नेता वर मोठा असून चालत नाही त्याचे खाली कार्यकर्त्यांचे नेटवर्क असायला हवे. मुंडेंचे ग्राऊंड नेटवर्क विस्कटले आहे, असेही धस म्हणाले.