आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ- राजमध्ये दिलजमाई नाहीच?, ब्लॉगवर राज-मनसेचा उल्लेख टाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'झाले गेले गंगेला अर्पण' असे सांगून अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेला दुरावा आपल्याकडून तरी मिटल्याचे राज ठाकरेंनी सोमवारी जाहीर केले असले तरी 'गंगा किनारे का छोरा' अमिताभ यांच्याकडून मात्र 'गिले, शिकवे' संपल्याबाबत प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र मनसे किंवा राज ठाकरे यांच्यासोबत आपली मनापासून दिलजमाई झाली नसल्याचे संकेत बीग बी यांनी ब्लॉगवरून दिले आहेत. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मनसे चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाचे वर्णन केले. मात्र त्यात एकदाही राज यांच्या नावाचा किंवा त्यांच्या संघटनेचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या दोघांत मनापासून दिलजमाई झाली नसल्याचेच दिसून येत आहे.
मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे व बिग बी अमिताभ बच्चन सोमवारी षण्मुखानंद सभागृहात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी या दोघांतील मागील वाद संपल्याचे मानले जात होते. या कार्यक्रमानंतर देशभर या दिलजमाईची चर्चा झाली. पुढे अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन ज्या पक्षाच्या खासदार आहेत त्या पक्षाच्या मुंबईतील आमदाराने अमिताभवर कोरडे ओढले होते. राज ठाकरेंची भूमिका बदलली नसताना त्यांच्या व्यासपीठावर जाणे म्हणजे हा उत्तर भारतीयांचा अवमान आहे अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली तसेच आझमी यांनी बच्चन यांना अप्रत्यक्षरित्या गद्दार म्हटले आहे. यावरून राष्ट्रीय माध्यमांनी या घटनेची दखल घेतली व नेहमीप्रमाणे सवंग चर्चा झडल्या. मात्र, खुद्द बिग बींनी मात्र राज यांच्यासोबतचे वितुष्ट मनापासून तोडले नसल्याचे दिसून येत आहे.
पुढे वाचा, बच्चन यांनी ब्लॉगवर काय म्हटले आणि कशाला उजाळा दिला...