आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सेल्फी\' पाहून राज ठाकरेंनी आयुष्यात प्रथमच काढला सेल्फी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरेंनी आपल्या आयुष्यात प्रथमच काढलेला सेल्फी... - Divya Marathi
राज ठाकरेंनी आपल्या आयुष्यात प्रथमच काढलेला सेल्फी...
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरेंनी रविवारी शिल्पा नवलकर लिखीत आणि अजित भुरे दिग्दर्शित 'सेल्फी' हे नाटक पाहिले. महिलांच्या आयुष्यावर बेतलेलं नाटक राज ठाकरेंना इतकं भावलं की त्यांनी चक्क 'सेल्फी'च्या टीमसोबतच सेल्फी काढला.
अजित भुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सेल्फी'ला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कलेचे भोक्ते असलेल्या राज ठाकरेंनाही सेल्फी नाटक पाहण्यास आमंत्रित करण्यात आले. राज ठाकरेंनाही हे नाटक फारच आवडले. स्त्री वर्गावर बेतलेल्या या नाटकाचा विषय भुरे यांनी उत्तम हाताळला आहे. त्यांच्या दिग्दर्शनाला शिल्पा नवलकर यांच्या लेखनीने तेवढीच दमदार साथ दिली आहे.
राज ठाकरे आता राजकारणी असले तरी ते मूळचे एक कलाकार (व्यंगचित्रकार) आहेत. त्यांना चांगल्या-वाईटाची उत्तम जाण आहे. त्यातच मराठी सिने-नाट्य इंडस्ट्रीच्या ते कायमच पाठीशी राहिले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्याला मनापासून आवडलेल्या सेल्फी नाटकाचे व त्यांच्या टीमचे तोंड भरून कौतूक केले. मग राज ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीने त्यास दाद दिली. 'सेल्फी' नाटकाच्या टीमसोबत राज ठाकरेंनी आयुष्यातला पहिला सेल्फी काढला. राज ठाकरेंचा हा हटके सेल्फी आता सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे.
पुढे वाचा, काय आहे सेल्फी नाटक व कोण आहेत यात कलाकार...