आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray, Cm Chavan May Visit From Tommarow At Marathwada Region

पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे उद्यापासून गारपीटग्रस्त भागांची पाहणी करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला आहे. मराठवाड्याला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. त्यासाठी उद्यापासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसेचे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार आहेत. राज ठाकरे औरंगाबादसह जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद भागाचा दौरा करणार आहेत. याचबरोबर राज ठाकरे जेथे गारपीट झाली आहे मात्र ते जाऊ शकणार नाहीत त्या ठिकाणी मनसेचे उर्वरित वरिष्ठ नेते भेट देणार आहेत. तसेच गारपीटग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार करण्यात येईल असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वर्धापनदिनाच्या भाषणात राज यांनी मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र तेथे जाऊन काय करू, असा प्रश्न स्वत:लाच विचारला होता. मात्र आता किमान दिलासा देण्यापुरता व सर्वच राजकीय नेते गारपीट झालेल्या भागांना भेट देत असल्याने राज यांनीही तसा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरेही दौरा करणार आहेत. मात्र त्यांचे पक्षाचे विधानसभेतील नेते सुभाष देसाई परवापासूनच मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे हे गेल्या दोन-तीन दिवसापासून या भागाला भेट देत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या पातळीवरून लवकरच मदत जाहीर करू, असे पवारांनी म्हटले आहे. इंदापूर, बारामती, जामखेड भागाला काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली होती.
छायाचित्र: महाराष्ट्रात गारपीटीने हजारो कोटींचे नुकसान होत असताना राज्याच्या दौ-यावर आलेले राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री व्यस्त होते. त्यानंतर दिल्लीत जागा वाटपासाठी निघून गेले होते. अखेर आठ दिवसानंतर चव्हाण उद्यापासून गारपीट भागाची पाहणी करणार आहेत.
पुढेेे आणखी वाचा, नेत्यांनी नुसते दौरे करून शेतक-यांना काय मिळणार?