आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाळासाहेबांच्या दु:खातून सावरलो नाही; वाढदिवसाचे होर्डिंग, बॅनर लावू नका\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. परंतु आपला वाढदिवस आपल्या समर्थकांना साजरा न करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी शहरात होर्डिंगबाजी करू नये, बॅनर लावू नयेत तसेच प्रसारमाध्यमांतून जाहिरातीही प्रसिद्ध करून नयेत, असेही राज ठाकरेंनी बजावले आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन एक वर्षही झालेले नाही. तसेच त्यांच्या निधनाच्या दु:खातून आपण अजूनही सावरलो नसल्यामुळे आपला वाढदिवस साजरा केला जाऊ नये, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरे बोलत होते.
'बाळासाहेब ठाकरे यांचे गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. मी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली होती. मात्र त्यानंतरही माझे बाळासाहेबांवरील प्रेम आणि आदर कायम होता आणि आजही आहे', असेही राज यांनी याप्रसंगी व्यक्क केले आहे.