आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमे चांगल्या कामाची दखल घेतच नाहीत; राज ठाकरे भडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेने केलेल्या चांगल्या कामाची प्रसार माध्यमे दखल घेतच नाहीत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी प्रसार माध्यमांवर टीका केली. नाशिकच्या गोदापार्कवरून माध्यमांनी केलेली टीका चांगलीच जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी हे ताेंडसुख घेतले.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरात राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला गोदापार्क हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प वाहून गेला. त्यावरून प्रसार माध्यमांत मनसेच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला राज ठाकरेंनीही उत्तर दिले आहे. मुंबईतील भांडूप परिसरातील टेंभीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद््घाटन सोहळ्यात रविवारी बोलताना ते म्हणाले की, ‘गोदापार्क हा प्रकल्प वाहून गेला तर म्हणे नवनिर्माण वाहून गेले. लाज नाही वाटत अशी टीका करताना. गोदापार्क हा काय माझ्या बायको-मुलांसाठी उभा केलेला प्रकल्प होता का? तिथे काय माझी मुले जाऊन खेळणार नव्हती,’ असे सांगत राज म्हणाले की, ‘मनसेच्या कामाची जाणूनबुजून दखल घेतली जात नाही.’
गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये झालेल्या उच्चांकी पावसामुळे आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले होते. केवळ २४ तासांत तब्बल २०४ मिलिमीटर पावसाची नांेद झाली होती. या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण हाेऊन राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट वाहून गेला आहे. यापूर्वीही २००८ मध्ये झालेल्या पावसाने गोदापार्क वाहून गेला होता.
मुद्दे टाळण्यासाठी वेगळ्या विदर्भाची चर्चा
विधानसभेतवेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळावरदेखील राज यांनी आपल्या भाषणात जोरदार टीका केली. ‘सत्ताधारी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून लोकांना उल्लू बनवत अाहेत. आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन आपले अपयश उघडे पडू नये म्हणून वेगळ्या विदर्भासारखे विषय मुद्दाम काढून वेळ मारून नेली जात आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...