आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी लक्ष्मीपूजनाला ठाकरी शैलीच्या कुंचल्यातून काढले मोदी सरकारचे वाभाडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून ठाकरी शैलीच्या कुंचल्यातून नरेंद्र मोदी सरकारचे वाभाडे काढले आहे. राज यांनी आज (गुरुवार) फेसबूक पेजवर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. व्यंगचित्रांत उजवीकडे लक्ष्मी तर डावीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसत आहे.

खुद्द लक्ष्मीच मोदी आणि शहा जोडीसमोर हात जोडून 'देश चालवायला मला थोडे पैसे देता का?' अशी विनंती करत असल्याचे राज यांनी दाखवले आहे.

राजकीय- सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याचं मोठे काम व्यंगचित्र करतात. एका अर्थी ते राज्यकर्त्यांना आणि समाजाला वठणीवर आणत असतात. परंतु सध्याचे एकूण राजकारण पाहता व्यंगचित्रकाराला आपले काम करणे कठीण होऊन बसले आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. व्यंगचित्र रेखाटताना राज ठाकरे यांचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...