आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray Comment To Motion Aginest Two Chennal Editors

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्रकारांविरोधात हक्कभंग दाखल करणे चुकीचेच- राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळाच्या वास्तूत एका पोलिस अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या आमदारांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेऊन पत्रकांराविरोधात हक्कमंग दाखल करणे चुकीचे असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे पत्रकार निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्या मदतीला धावून आले आहे.

पत्रकार आपल्या माध्यमातून समाजाची भूमिका स्पष्ट करत असतो. विधिमंडळातील सगळा प्रकार पाहून कोणीही आक्रमक होऊ शकला असता. तसेच 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे आणि ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर हे दोघे आक्रमक झाले. त्यांनी मात्र सामान्य जनतेच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे काहीही चुकलेले नाही. समाजात काय घडते आहे. ते जनतेपर्यंत पोहचवणे हे तर प‍त्रकाराचे कर्तव्यच असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या दरम्यान आमदारांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्याविरोधात सादर केलेला हक्कभंग प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी गुरुवारी स्वीकारून तो विशेष अधिकार समितीकडे पाठवला. याच कारणावरून विधानसभेतही वागळे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणाबाबत वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली, तेव्हा दोन्ही संपादकांनी आमदारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत कॉँग्रेसचे भाई जगताप यांनी गुरुवारी विधान परिषदेत हक्कभंग मांडला. शासन व प्रशासन यांच्यात वाद निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही जगताप म्हणाले. इतर सदस्यांनीही त्यांना साथ दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही याच भावना व्यक्त करत विधानसभेत वागळेंविरोधात हक्कभंग आणला होता.