आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Critcis Modi shah Through The Line After Words

दिल्लीतील भाजपच्या पानिपतानंतर राज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीत भाजपचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर आता त्यांनी मोदी-शहा या भाजपमधील पॉवरफुल्ल जोडगळीवर व्यंगचित्र काढून कलात्मक टीका केली आहे. एखाद्या संघाला, संघटनेला जी व्यक्ती लीड करीत असते त्याच्यावरच चांगल्या- वाईट गोष्टीची अंतिम जबाबदारी जाते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्या प्रकारे ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली होती त्यामागे नरेंद्र मोदीच होते. दिल्लीची निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच लढली गेली. त्यामुळे हा पराभव मोदींचाच आहे. गेल्या काही दिवसातील अनुभवावरून मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागले आहे हे सर्वांना मान्यच करावे लागेल, अशा शब्दात राजकीय टीका केल्यानंतर राज यांनी आपल्या व्यंगचित्रातूनही फटकारे मारले आहेत.
काय सांगायचे आहे राज ठाकरेंना या व्यंगचित्रातून....
अमेरिकेत जसे 9/11 घडले व दोन बलाढ्य टॉवर पाडले गेले व महासत्ता अमेरिकेला हादरा दिला गेला तसाच हादरा सध्या भारतातील सर्वात दोन पॉवरफुल्ल व्यक्ती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजप पक्षाच्या अध्यक्षांना केजरीवाल यांनी दिला आहे. यात मोदी व शहांसारख्या पॉवरफुल नेत्यांना जमिनदोस्त करण्यात केजरीवाल यांना यश आल्याचे दाखविले आहे. याचबरोबर 9/11 चे दहशतवादी दृश्य जसे जगाने पाहिले तसेच मोदी-शहांच्या सत्तेला भगदाड पडल्याचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तेथील सीएनएन या वृत्तवाहिनीवर पाहत असल्याचे दाखवले आहे.
पुढे पाहा, व्यंगचित्र काढतानाचे राज ठाकरे.... व देशातील ताज्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारी व्यंगचित्रे...