आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी कापला ओवेसींच्या प्रतिमेचा केक; नव्या वादाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएयचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा चेहरा असलेला केक कापताना राज ठाकरे... - Divya Marathi
एमआयएयचे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा चेहरा असलेला केक कापताना राज ठाकरे...
मुंबई- मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिमा असलेला केक कापल्याने नवा वाद निर्माण झाला अाहे. या कृतीचा एमआयएमने निषेध केला अाहे.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरे घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना भेटत होते. त्या वेळी एका कार्यकर्त्याने ओवेसींची प्रतिमा असलेला केक राज ठाकरेंच्या समोर धरला. राज यांनी दुसऱ्या कार्यकर्त्याच्या हातातील सुरी घेऊन त्या केकच्या मधोमध रोवली. त्यानंतर इतर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत ते पुन्हा घरात निघून गेले. मात्र, राज ठाकरेंच्या या कृतीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या केकचे तुकडे करून एकमेकांना खाऊ घातले. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसेच्या या कृत्याचा निषेध केला असून केक कापणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

केकवरुन दुसऱ्यांदा वादात
२००८ मध्येही राज हे केक कापल्याच्या प्रकरणावरून वादात सापडले होते. त्या वेळी मनसेत असलेले नंतर नितेश राणे गोळीबारप्रकरणी वादात सापडलेले चिंटू शेख यांनी आणलेला "भय्या'अशी अक्षरे असलेला केक राज यांनी एका समारंभादरम्यान कापला होता. त्याची छायाचित्रेही त्या वेळी मनसेच्या वतीने माध्यमांना पाठवण्यात आली होती.
राज ठाकरेंवर सडकून टीका -

दरम्यान, MIM चे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे विजणारा दिवा आहे. तो आता फडफडतोय. आपल्याला व पक्षाला आता कोणीही विचारत नसल्याने राज ठाकरेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. मी राज ठाकरेंचा निषेध करतो अशी जळजळीत प्रतिक्रिया आमदार वारिस पठाण यांनी दिली आहे.
पुढे आणखी वाचा, केक प्रकरणाबाबत...
बातम्या आणखी आहेत...