आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये सुसाइड बाॅम्बर पाठवावेत - अबू आझमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उरी दहशवादी हल्ल्याचे पडसाद बाॅलीवूडमध्ये उमटत आहेत. पाक कलाकारांनी भारत सोडून जावे, अन्यथा या कलाकारांसकट त्यांना संधी देणाऱ्या निर्मात्यांनाही चोपून काढू, अशी धमकी मनसेने दिली. मनसेवर पलटवार करताना समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी कलाकारांना मारण्यापेक्षा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये सुसाइड बाॅम्बर पाठवावेत, असे खुले आव्हान दिले आहे. याचे पडसाद टीव्ही क्षेत्रातही दिसत असून झी समूहाच्या जिंदगी वाहिनीवरील पाकिस्तानी मालिका बंद पडण्याची दाट शक्यता आहे. झी समूहाचे प्रमुख डाॅ. सुभाष चंद्रा यांनी तसे टि्वट केले आहे.

४८ तासांत पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे, अन्यथा आम्ही त्यांना पिटाळून लावू. प्रसंगी त्यांना चोपून काढण्यास मागेपुढे पाहणार नाही. मग आम्हाला काेणी गुंड म्हटले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, अशा इशारा मनसेच्या अमेय खोपकर यांनी पुन्हा दिला. मुंबईसह राज्यात पाक कलाकारांचे जिथे कुठे चित्रीकरण सुरू असेल ते उधळून लावू. त्यांना काम देणाऱ्या निर्मात्यांनाही चोप दिला जाईल. आता खरचं आमची सटकली आहे, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...