आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Demands Resignation Of Maharashtra Home Minister

मुंबई पोलिस आयुक्त, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- राज ठाकरे यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील हिंसाचारप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्‍यावर तोफ डागली असून त्‍यांनी तात्‍काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केली आहे. या मागणीसाठी राज ठाकरे मंगळवारी मोर्चा काढणार आहेत.
राज ठाकरे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मुंबईत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. यासंदर्भात स्‍पष्‍ट इशारादेखील पोलिसांना मिळाला होता. तरीही ही घटना घडली. हे पोलिस आयुक्तांचे अपयश आहे. त्‍यांनी तत्‍काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्‍याच्‍या गृहखात्‍यालाही गांभीर्य नाही. अजित पवार स्‍वतःला टग्‍या म्‍हणतात. तर त्‍यांनी टगेगिरी करुन गृहखाते सांभाळावे आणि यंत्रणा सुधारावी, असे राज ठाकरे म्‍हणाले.

टोल नाक्यावरील आंदोलनात माझे कार्यकर्ते गाड्या मोजतात, वास्‍तव पडताळून पाहतात. तिथे हजारो पोलीस तैनात करण्‍यात येतात. परंतु, जिथे अशा प्रकारच्‍या हिंसाचाराची पूर्वसुचना असते, तिथे मोजकेच पोलिस बंदोबस्‍तासाठी असतात. गृह खात्‍याचे हे पूर्ण अपयश आहे, असे राज ठाकरे म्‍हणाले.
परप्रांतियांवर हल्‍लाबोल
मुंबई हिंसाचाराच्‍या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी परप्रांतियांवरही हल्‍लाबोल केला. ते म्‍हणाले, मुंबईचा माणूस अशा प्रकारचा हिंसाचार कधीही करणार नाही. हे सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. मी वारंवार युपी आणि बिहारबाबत बोलत असतो ते याच कारणांमुळे इथे येऊन अशा प्रकारच्‍या दंगली घडविण्‍यामागे याच परप्रांतियांचा हात असतो. इथे मुंबईत एखादे मुल पळविले जाते. ते उत्तर प्रदेशात कुठेतरी सापडते. हे सर्व याच लोकांमुळे. बांगलादेशींचा प्रश्‍न भविष्‍यात अतिशय गंभीर होणार आहे, असा इशाराही राज यांनी दिला.
मुंबई हिंसाचार :परकीय शक्तींचा सहभाग पडताळणार
मुंबई हिंसेमध्‍ये 'अमर जवान' शहिद स्‍मारकाची तोडफोड
मुंबई हिंसाचार: पूर्वनियोजित कट असल्‍याचा पोलिसांचा दावा