आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा जिंकला, काम हरलं; राज ठाकरे म्हणाले, हा शेवटचा पराभव, कसं लढायचं ते शिकलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील मनसेने पाहिलेला हा शेवटचा पराभव असेल, असा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच केलेली विकासकामे आणि निवडणुका यांचा काहीही संबंध नसतो, ही बाब माझ्या लक्षात आली असून यापुढे निवडणुका जिंकण्यासाठी जे आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी मनसेदेखील करणार, असे सांगत राज यांनी निवडणुकांमध्ये सरशी साधलेल्या शिवसेना आणि भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकादेखील केली.   

मनसेचा अकरावा वर्धापन दिन गुरुवारी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज यांनी “पैसा जिंकला आणि काम हरले’ या एका ओळीत मनसेच्या पराभवाचे विश्लेषण केले. ज्यांनी मनसे उमेदवारांना मते दिली त्यांचे त्यांनी या वेळी आभार मानले. मात्र, ज्यांनी कधी कामे केली नाहीत, उलट बाहेरचे गंुड पक्षात घेऊन त्यांना निवडणुकीत उभे केले त्यांना लोकांनी निवडून दिले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, हा जो पायंडा लोकांनी पाडला आहे, तो भविष्यात भयंकर त्रासदायक होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या भाषणात नाशिक महापालिकेतील पराभवाची सल स्पष्टपणे जाणवत होती. नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान करत राज ठाकरे म्हणाले, या पराभवाने मला निवडणुका कशा लढवाव्यात हे शिकवले आहे. त्यामुळे यापुढे लोकांना जे हवे आहे, त्याचा पुरवठा होणार असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच या निवडणुकीत जे जिंकले आहेत, त्यांचे फासे घेऊन आपण यापुढच्या निवडणुका लढवणार असल्याचे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुका जिंकलेल्या पक्षांना लक्ष्य करत त्यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. वर्धापनदिनाला राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांची  मोठी उपस्थिती होती.
 
विकासकामे करूनही पैशाचा विजय झाल्याची खंत   
मनसेची कार्यपद्धती बदलण्याचे दिले संकेत   
आपल्या भाषणात राज यांनी मनसेची कार्यपद्धती बदलण्याचे संकेत दिले. आतापर्यंत तुम्ही मला भेटायला येत होतात, यापुढे मी आणि सर्व नेतेमंडळी तुम्हाला भेटायला येणार असल्याचे विधान त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले. तसेच पैसा जिंकला आणि काम हरले, असे सांगत यापुढे लोकांना जे हवे त्याचा”पुरवठा’ केला जाईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
   
आमदार परिचारकांसारख्यांना फोडून काढले पाहिजे   
भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी लष्कर जवानांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत राज म्हणाले, अशा लोकांना चौकाचौकात चपलेने फोडून काढले पाहिजे. आम्ही जेव्हा पाकिस्तानी कलाकारांविरोधात भूमिका घेतो, तेव्हा आमच्यावर टीका होते. मात्र, भाजपने काहीही केले तरी सगळे खपून जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
 
पुढील स्लाईडवर वाचा, का म्हणाले माझ्या व्यथा पुरुषानांच सांगू शकतो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...