आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी दौरा: राज ठाकरे सोलापूर व उस्मानाबादेत, कोर्टात आजही लावली हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे आज सकाळी नऊ वाजता दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होताना... - Divya Marathi
राज ठाकरे आज सकाळी नऊ वाजता दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होताना...
सोलापूर- राज ठाकरे यांच्या दुष्काळी दौ-याचा आज दुसरा दिवस सुरु आहे. राज ठाकरे बुधवारी रात्री सोलापूरात मुक्कामी होते. आज सकाळी नऊ वाजता ते दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. सकाळी 10 वाजता त्यांनी सोलापूरातील मडकी वस्ती येथे विंधन विहीर व पाईप लाईन कामाचा शुभारंभ केला. त्यानंतर ते परांडा येथील न्यायालयात हजर झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी उस्मानाबादमधील कोर्टात हजेरी लावली. दरम्यान, राज यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच 3500 रूपये दंड करण्यात आला. यापुढे तोडफोड न करण्याचे वजन राज यांनी कोर्टात दिले.
दहा दिवसांसाठी राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर निघालेले मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे बुधवारी सोलापुरात दाखल झाले. मराठवाड्यातील काही भागांचा दौरा करून सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले. सोलापूरचा दौरा दोन दिवसांचा आहे. यावेळी मनसेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 10 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तर तीन महिला विडी कामगारांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना 500 लिटर क्षमतेच्या 100 टाक्यांचे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे 100 टाक्या जिल्हातील दुष्काळग्रस्त भागात देण्यात येणार आहेत. यावेळी मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहराध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, उमेश रसाळकर उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा आजचा दौरा असा असेल-
दुपारी 1.15 वाजता तुळजापुर शासकीय विश्राम गृह भेटीगाठी
दुपारी 3.00 वाजता नळ दुर्ग किल्ल्याची पाहणी
सायंकाळी 5.00 सोलापूर येथे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
सायंकाळी 5.30 सोलापूर शहर हिपरगा तलावास भेट...
रात्री- सोलापूरात मुक्काम..
पुढे पाहा, राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौ-यातील छायाचित्रे...