आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Meet Police Commissioner Rakesh Maria At Mumbe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची आयुक्तालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. गेल्या चार-पाच वर्षांपासूनचा नवनियुक्त पोलिस आयुक्तांच्या भेटीचा शिरस्ता या वेळीही राज ठाकरेंनी पाळला. सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे मारियांच्या भेटीसाठी पोलिस आयुक्तालयात दाखल झाले.
या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईसुद्धा हजर होते. अर्धा तास सुरू असलेल्या या बैठकीत दोहोंमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. यात मारिया यांनी 1993 मध्ये झालेल्या मुंबई स्फोटात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा राज ठाकरेंनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधायला नकार दिला.या अगोदरही मुंबईचे पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या राज ठाकरे यांनी सदीच्छा भेटी घेतल्या आहेत.