आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहीर सभेत एकमेंकांची खेचणारे राज ठाकरे- रामदास आठवले जेव्हा भेटतात....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवले यांच्या मातोश्री हंसाबाई यांचे मागील आठवड्यात निधन झाले.  त्यांचे सात्वंन करण्यासाठी राज ठवले यांच्या संविधान बंगल्यावर गेले होते. - Divya Marathi
आठवले यांच्या मातोश्री हंसाबाई यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यांचे सात्वंन करण्यासाठी राज ठवले यांच्या संविधान बंगल्यावर गेले होते.

मुंबई- जाहीर राजकीय सभांत एकमेंकांवर सडकून टीका करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची गुरुवारी भेट घेतली. रामदास आठवले यांच्या मातोश्री हंसाबाई आठवले यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यामुळे त्यांचे सात्वंन करण्यासाठी राज ठाकरे काल सायंकाळी आठवले यांच्या संविधान बंगल्यावर गेले होते. यावेळी दोघांत बराच संवाद सुरू होता. राज यांच्यासोबत बाळा नांदगावकर होते तर आठवलेंसह त्यांचा मुलगा व पत्नी उपस्थित होते.

 

या भेटीबाबत रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत भाष्य केले. 'पुढे काय करायचं असा प्रश्न आमच्यासमोर आहेत. आमच्या सभांना मोठी गर्दी होती पण त्याचे मतांत परिवर्तन होताना दिसत नाही. आता सगळे प्रयोग करून झाले, आता एकच प्रयोग बाकी!'असे विनोदी भाष्य करत आठवले यांनी रिपाइं-मनसे यांची युती हाच प्रयोग आता बाकी राहिला आहे अशी टिप्पणी केली.

 

राज ठाकरे यांनी जाहीर राजकीय सभांत रामदास आठवले यांची यथेच्छ धुलाई केली आहे. रामदास आठवलेंच्या शैलीत खास नकला करून राज यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते तर रामदास आठवले यांच्या 'तेरे नरडी का घोट' अशा मोडक्या तोडक्या मराठी-हिंदी मिश्रीत भाषेत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. या दोघांत राजकीय कटुता, वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंधात कुठेही परिणाम होऊ दिलेला नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतून राजकीय विरोधक असले तरी त्यांचा संबंध वैयक्तिक आयुष्याशी जोडला जात नाही. राज ठाकरे आणि रामदास आठवले यांच्या या ताज्या भेटीतूनही तेच समोर आले आहे. 

 

पुढे स्लाई़डद्वारे पाहा, राज ठाकरे व आठवले यांच्या भेटीचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...