आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी मुद्द्यासाठी प्रसंगी काेर्ट अवमान कारवाईलाही तयार : राज ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘न्यायालयाचा आम्ही आदर करतो, मात्र प्रत्येक गोष्टीत न्यायालयाने नाक खुपसू नये,’ असे वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसंगी न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईलाही आपण घाबरणार नसल्याचे बेधडक वक्तव्य बुधवारी केले. रिक्षा परवाने वितरणात मराठी मुलांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठी मुलांना रिक्षा परवान्यांमध्ये प्राधान्य, मराठी भाषेला अभिजात दर्जा, नाशिकचा पूर आणि राज्यातील अधिवास धोरणाबाबतच चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. या भेटीबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांनीही दिली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीचा सर्वाधिक फायदा मराठी लोकांना झाला पाहिजे. आयटी कंपन्यांना आपण राज्याच्या करात सवलती द्यायच्या, त्यांना जागा नाममात्र दरात उपलब्ध करून द्यायच्या आणि तरी मराठी मुलांना तुम्ही नोकऱ्या देणार नसाल तर काय उपयोग?’ राज्यात रिक्षा परवाने मिळवण्यासाठी मराठी येणे सक्तीचे असून परवाने देताना मराठी मुलांना प्राधान्य दिलेच पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले. मात्र अलिकडेच ‘रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती करता येणार नाही’, या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर राज यांनी न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली. तसेच या टीकेबाबत आपल्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई झाली तरी आपण घाबरत नसल्याचे बेधडक वक्तव्यही त्यांनी केले.

नाशिकला मदत द्या
अधिवास धोरणाबाबतही राज म्हणाले, झारखंड राज्याने अवलंबलेले अधिवास धाेरण महाराष्ट्रातही राबवण्याची गरज आहे. राज्यात अधिवास धोरण लागू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही ते म्हणाले. गोदावरीच्या पुरामुळे नाशकातील नुकसानग्रस्तांना सरकारने मदत द्यावी, तसेच नाशिक महापालिकेचे १९० कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत असून ते देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली.

तावडेंकडून फक्त गाजावाजा - मराठीला अभिजातच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी फक्त गाजावाजा केला. प्रत्येक गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करण्याची गरज काय? असा टाेलाही ठाकरेंनी लगावला.

मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा
‘वर्षा’ येथील भेटीदरम्यान मनसेच्या सर्व नेत्यांसमक्ष मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यादरम्यान बंद दाराआड सुमारे २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मनसेच्या एका नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. गेल्या दोन महिन्यांत राज यांनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुख्‍यमंत्री आणि राज यांच्‍यात काय झाली चर्चा... मुख्‍यमंत्री भेटीचा राजकीय दृष्‍टीनेही लावला जातो अर्थ.... यापूर्वीही घेतली होती दोन वेळा भेट... काल नांदगावकर यांनी घेतली होती अजित पवारांचीही घेतली भेट...