आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बंद दाराआड 30 मिनिटे चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या बंगल्यावर भेट घेतली. नीटबाबत फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका मांडली व त्यामुळे केंद्राने किमान यंदातरी महाराष्ट्रातील मुलांना नीटऐवजी राज्याच्या सीईटीद्वारेच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राज ठाकरे त्यांचे आभार मानायला गेले होते. राज यांच्यासमवेत नीटच्या मुद्यांवरून लढा दिलेल्या काही पालकांचाही समावेश होता. फडणवीस यांच्यासमवेत राज आणि पालकांनी सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. यावेळी आगामी काळात महाराष्ट्र सरकारने योग्य भूमिका घेऊन राज्यातील मुलांवर अन्याय होणार नाही यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती राज यांनी फडणवीस यांना केली. यावर फडणवीस यांनी राज्य सरकार करीत उपाययोजनांबाबत राज व पालकांना माहिती दिली. सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षेचे स्वरूप बदलणे, 11 वी 12 वीचा अभ्यासक्रम एकत्रित करणे व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन, सूचना घेण्याचे सरकारने ठरविल्याचे फडणवीस यांनी राज यांना सांगितले. मात्र, यंदा 11 वी झालेले व 12 वी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा 2017 साली फटका बसणार असल्याचे राज यांनी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. त्यावरही तोडगा काढला जाईल असे सीएम यांनी सांगितले.
मागील महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत यंदा नीटऐवजी 8 राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्याच्या सीईटीनुसार घेण्यास हिरवा झेंडा दाखवला होता. याप्रकरणी राज यांनी नीटमुळे राज्यातील मुलांवर अन्याय कसा होतो यावर प्रकाशझोत टाकला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी मोदींची दिल्लीत भेट घेऊन नीटमुळे प्रादेशिक भाषेतील मुलांचे कसे नुकसान होते हे पटवून दिले होते. त्यानंतर केंद्राने अध्यादेश काढला होता.
राज-फडणवीस यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा-
दरम्यान, नीटच्या मुद्यांवर 20 मिनिटे चर्चा झाल्यावर पालक यांच्यासह इतर अधिकारी वर्षावरून बाहेर पडले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात वर्षावर बंद दाराआड सुमारे अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे कळते. तसेच मुंबई महापालिका व एकनाथ खडसे प्रकरणावर चर्चा झाल्याची बोलले जात आहे. याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
पुढे आणखी पाहा, यासंदर्भातील माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...