आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या भूमिकेचे ‘राज’ अाज उलगडणार! शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पक्ष स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्याची धार बोथट होत असताना नव्या राजकीय मुद्द्याच्या शाेधात असलेले राज ठाकरे या मेळाव्यातून आपल्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करतील, अशी अाशा अाहे.

पक्षाला दहा वर्ष पूर्ण झाल्याने एक टप्पा गाठताना पक्ष आपल्या राजकीय विचाराची कूस बदलणार का? याबाबतही उत्सुकता आहे. आतापर्यंत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या राज ठाकरेंनी गेल्या काही भाषणांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या मुद्द्यांभोवती त्यांचे भाषण राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने त्यांच्या निशाण्यावर असदुद्दीन ओवेसी, मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मंत्री आणि श्रीहरी अणे हे असतील. या शिवाय दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, सत्तेत राहून विरोधाची भाषा करणारी शिवसेना, महापालिका निवडणुका अशा इतरही मुद्द्यावर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरेंची तब्येत गेल्या चार पाच दिवसांपासून ठिक नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.