आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Contact Him Who Leave Party Raj Thackeray To Party Workers

पक्षातून बाहेर गेलेल्या गद्दारांशी संबंध ठेवू नका- राजसाहेबांची कार्यकर्त्यांना तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागील काळात पक्षातून जे लोक बाहेर पडले आहेत त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नका असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला. पक्षाशी गद्दारी करणा-यांना यापुढे कोणतेही स्थान नसेल असे सांगत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरला.
राज यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची गुरुवारी कृष्णकुंजवर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पक्षाचे माजी आमदार प्रविण दरेकर यांचे बंधू नगरसेवक प्रकाश दरकेर हे सुद्धा उपस्थित होते. प्रकाश दरेकर बैठकीत दिसताच राज यांनी त्यांना तत्काळ बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच वातावरण धीरगंभीर बनले.
नगरसेवकांत शांतता पसरल्याचे दिसताच राज यांनी सांगितले की, पक्षातील ज्या लोकांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या सर्वांचे राजीनामे मी स्वीकारले आहेत. त्यांचा आणि पक्षाचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. मी त्यांच्याशी संबंध तोडले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही अशा लोकांसमवेत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नये असा आदेश दिला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर प्रविण दरेकर, वसंत गीते व अतुल चांडक यांच्यासह काही नेत्यांनी राजीनामे दिले होते. राज यांनी त्यांचे राजीनामे तत्काळ स्वीकारत त्यांना पक्षातून बाहेर काढले होते. दरम्यान, राज यांच्या कडक भूमिकेने कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना काही चुका घडतात. त्याला मोठ्या मनाने माफ केले पाहिजे. प्रविण दरेकर यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांनी दुस-या कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच पराभवाची जबाबदारी घेत दरेकर यांनी राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत त्यांचे बंधू जे पक्षाचे नगरसेकव आहे त्या प्रकाश दरेकरांना बैठकीतून बाहेर जा अशी अपमानास्पद वागणूक द्यायला नको होती अशी भावना या वरिष्ठ पदाधिका-याने मांडली. मात्र, राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, राज ठाकरेंच्या आदेशानंतर प्रविण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली...