आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवला भेटायचे तेव्हा भेटेन : राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी समेट घडवण्याचे संकेत दिले आहेत. आम्हाला जेव्हा भेटू, बोलू वाटेल तेव्हा बोलू, तुम्हाला (मीडिया) त्याची चिंता का? ज्या वेळी हे होईल तेव्हा ते होईल. मी कधीही उद्धव यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केल्यानंतर मला चिकन सूपबाबत बोलणे भाग पडले. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला असता तर त्यांनी मी पाठवलेले सूप प्यायले असते का? दरम्यान, गेल्या आठ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली राज्याची ब्ल्यूप्रिंट येत्या ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करणार असल्याचे राज म्हणाले.