आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, CM Candidate Demand

राज यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा; मनसेची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्याने भाजपला मिळालेले यश पाहता मनसेनेही राज ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसेत जोर धरू लागली आहे. राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीत मनसेच्या झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली तेव्हा तर मनसेचे नेतेही चक्रावून गेले.
पराभवाची कारणमीमांसा व 31 मे रोजी होणार्‍या राज ठाकरेंच्या सभेच्या नियोजनासाठी गुरुवारी मुंबईतच्या यशवंत नाट्यमंदिरात पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करून आगामी विधानसभेला सामोरे जाऊ, असा सूर लावला.
मनसेचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आम्ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज ठाकरे तिचा नक्की विचार करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंट व मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरेंचे नाव अशी दुहेरी रणनीती मनसेच्या वतीने आगामी निवडणुकीत आखली जाण्याची शक्यता आहे.